मुंबई- कुलभूषण जाधव यांचे वकीलपत्र कुणीही घ्यायचे नाही, असा ठराव पाकिस्तानमधील लाहोर उच्च न्यायालयाच्या सर्व वकिलांनी केला आहे. कुणीही हे वकिलपत्र घेतल्यास त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे भारताला कुलभूषण यांच्या वकिलाबाबत दक्ष राहावे लागेल, असा सल्ला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यालयात आज कुलभूषण जाधव यांना दिलासा देण्यात आला. त्यांना काऊन्सिलर अॅक्सेस देण्यात आला. त्यामुळे भारताचे अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटू शकणार आहे. त्यानंतर पाकिस्तानने जाधव यांच्याकडून घेतलेला तथाकथित जबाब मारहाण करून घेतला आहे का? खोट्यारितीने त्यांच्याकडून हा जबाब नोंदवून घेण्यात आला, हे आपण सिद्ध करू शकणार आहोत. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयातून हा खटला हलवता येणार आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल, असे उज्ज्वल निकम म्हणाले.