मुंबई - सणासुदीच्य़ा काळात फराळाला मोठे महत्व असते. मात्र, तोच फराळ आता धोकादायक सिद्ध होत आहे. फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य भेसळयुक्त असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने अनेकवेळा अशा प्रकारच्या अन्नपदार्थांमध्ये घातक पदार्थांची भेसळ केली जात असल्याचे उघड केले आहे. त्यामुळे याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दिवाळीत मिठाई खरेदी करताय? मग हे वाचा... - FDA ADVISE
सणासुदीच्या काळात अन्न पदार्थामधील भेसळीत वाढ होते. अशा भेसळयुक्त अन्नपदार्थांचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरते. तेव्हा मिठाई वा कुठलेही अन्नपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तर दुसरीकडे दिवाळीत होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) सज्ज असते.
काळजी काय घ्यावी ?
तयार फराळाची, फराळासाठीच्या कच्चा मालाची आणि मिठाई-खवा-माव्याची खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण सणासुदीच्या काळात अन्न पदार्थामधील भेसळीत वाढ होते. अशा भेसळयुक्त अन्नपदार्थांचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरते. तेव्हा मिठाई वा कुठलेही अन्नपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तर दुसरीकडे दिवाळीत होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) सज्ज असते. अन्न पदार्थांची तपासणी करत अन्नाचे नमुने घेत त्याची चाचणी प्रयोगशाळेत केली जाते. आपण घरच्या घरी काही पदार्थांची तपासणी करु शकतो. या चाचणीत अन्न पदार्थात भेसळ आढळली तर कायदेशीर कारवाई केली जाते.