महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corporation : मुंबई महापालिकेवर प्रशासक, महापौर अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट

सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने आयुक्त इकबाल सिंग चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांची प्रशासक (Administrator on Mumbai Municipal Corporation) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे महापौरांपासून वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांच्या कार्यालयाच्या परिसरात शुकशुकाट (Silence outside the mayor's office) पाहायला मिळाला.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिका

By

Published : Mar 8, 2022, 6:34 PM IST

मुंबई:फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. ९ मार्च २०१७ ला महापौरांची निवड झाली. महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला. महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने राज्य सरकारने पालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्ती (Administrator on Mumbai Municipal Corporation) केली आहे. कार्यकाळ संपल्याने सर्व समिती अध्यक्षांनी पालिकेने दिलेली वाहने जमा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अध्यक्षांकडून त्यांना देण्यात आलेली वाहने पालिकेने आपल्या ताब्यात घेतली आहेत.

अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट
महापालिका मुख्यालयात महापौर, वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांची दलाने आहेत. या दालनाबाहेर नेहमीच मुंबईकरांची गर्दी असते. मुंबईमधील नागरिक आपल्या समस्या घेऊन महापौर आणि अध्यक्षांना भेटतात. काल या सर्वांचा कार्यकाळ संपल्याने आज कोणीही महापालिकेत फिरकले नाही. यामुळे आज महापौरांच्या कार्यालयापासून समिती अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट (Silence outside the mayor's office) पाहायला मिळाला.

पावसाळा पूर्व कामांबाबत आढावा
दरम्यान आज पालिका आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती होताच आज इकबाल सिंग चहल (Commissioner Iqbal Singh Chahal ) यांनी पावसाळा पूर्व कामांबाबत आढावा बैठक घेतली. हि बैठक दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घेतली जाते. या बैठकीला महापालिका, अग्निशमन दल, एमएमआरडीए, रेल्वे, एनडीआरएफ आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details