मुंबई -उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्याल का? मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? अशा प्रश्नांना युवानेते आदित्य ठाकरे यांनी खुबीने बगल दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलण्याऐवजी आपण फक्त मिठी-मिठी बोली बोलू, असे सांगत त्यांनी राजकीय प्रश्न उडवून लावले. यावेळी त्यांनी मिठी नदीच्या स्वच्छतेच्या मुद्यावर भर दिला.
'विस्तारा'बाबत नाही तर फक्त मिठी-मिठी बोला.., आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नाला बगल - ramdas kadam
उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्याल का? मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? अशा प्रश्नांना युवानेते आदित्य ठाकरे यांनी खुबीने बगल दिली आहे. यावेळी त्यांनी मिठी नदीच्या स्वच्छतेच्या मुद्यावर भर दिला.
'शुद्ध हवेसाठी पर्यावरणपुरक दळणवळण' या विषयावर कार्यशाळा मुंबईत सुरू आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी उपस्थिती लावली आहे.
राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या म्हणजेच रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे.