महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशभक्तांना खुशखबर.. १२ व १३ सप्टेंबरला पश्चिम मार्गावरून लोकलच्या अतिरिक्त  फेऱ्या - गणेशोत्सवानिमित्त अतिरीक्त रेल्वे

गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी अतिरीक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १२ व १३ सप्टेंबरच्या रात्री चर्चगेट ते विरार मार्गावर रेल्वेच्या ४ विशेष गाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डेवीज यांनी दिली.

मुंबई लोकल रेल्वे

By

Published : Sep 11, 2019, 5:07 PM IST

मुंबई -गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी अतिरीक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १२ व १३ सप्टेंबरच्या रात्री चर्चगेट ते विरार मार्गावर रेल्वेच्या ४ विशेष गाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डेवीज यांनी दिली.

मुंबईत गणेशभक्तांसाठी १२ व १३ तारखेला पश्चिम मार्गावरून रेल्वेच्या अतिरिक्त लोकल गाड्या

विरारवरून सुटणाऱ्या गाड्या -

दुपारी १२:१५, १२:४५, १:४०, ३:०० वाजताच्या लोकल अनुक्रमे १:५२, २:२२, ३:१५, ४:४० वाजता चर्चगेटला पोहोचतील.

चर्चगेटवरून सुटणाऱ्या गाड्या -

दुपारी १:१५, १:५५, २:२५, ३:२० वाजताच्या लोकल अनुक्रमे २:५०, ३:३२, ४:०२, ४:५८ वाजता विरारला पोहोचतील.

गणेशोत्सवासाठी १२ व १३ तारखेला रेल्वेच्या ४ विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे चर्णी रोड, दादर येथील गर्दी कमी व्हावी तसेच रेल्वेस्थानकावरील रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी व्हावी यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डेवीज यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details