मुंबई- राज्यात झालेल्या परतीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांचेही आतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देताना शेतमजुरांनाही दिली जावी, अन्यथा याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिला. तसेच याविषयी सरकारला कायदेशीर नोटीसही बजावू, असाही इशारा त्यांनी दिला.
राज्यात असलेल्या दीड कोटी शेतकऱ्यापैकी, त्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी वगळता केवळ ३० लाख शेतकऱ्यांना श्रीमंत, अतिश्रीमंत शेतकऱ्यांनाच सरकारकडून देण्यात येणारी मदत वेळोवेळी मिळत असते. हे सर्व श्रीमंत शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर, महागड्या गाड्या, बागायती जमीन आहे. मात्र उर्वरित अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना मात्र मदत मिळत नाही. त्यातही शेतमजुर हा कायमच मदतीपासून वंचित राहीला आहे. यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना दिली जाणाऱ्या मदतीदरम्यान शेतकऱ्यांची माहिती स्थानिक स्तरावर घेऊन त्यांना शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ३० टक्के आर्थिक मदत जाहीर करून ती द्यावी, अन्यथा याविरोधात न्यायालयात जाऊन सरकारचा हा मदतीचा कार्यक्रम रोखून धरून, असा इशाराही ॲड. गुणरत्ने यांनी दिला.
समानेतच्या न्यायला हरताळ-