महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महेंद्रसिंग धोनीच्या चित्रपटात काम केलेल्या आणखी एका 'या' अभिनेत्याची आत्महत्या - actor sandip nahar suicide case

धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात धोनीची मुख्य भूमिका अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांने निभावली होती. मात्र, सुशांतने गेल्यावर्षी जूनमध्ये आत्महत्या केली. यानंतर आता त्याच चित्रपटात काम केल्या संदीप नाहर यांनीदेखील आपले जीवन संपविले.

actor sandip nahar
संदीप नाहर

By

Published : Feb 15, 2021, 8:30 PM IST

मुंबई -भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात काम केलेल्या आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संदीप नाहर असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या गोरेगाव येथील निवासस्थानी गळफास घेत आपले जीवन संपवले, अशी माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली.

सुशांतनंतर आता संदीप -

धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात धोनीची मुख्य भूमिका अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांने निभावली होती. मात्र, सुशांतने गेल्यावर्षी जूनमध्ये आत्महत्या केली. यानंतर आता त्याच चित्रपटात काम केल्या संदीप नाहर यांनीदेखील आपले जीवन संपविले. त्यांनी अभिनेते अक्षय कुमार यांच्यासोबतही काम केले होते. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली या प्रकरणाची चौकशी गोरेगाव पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details