मुंबई : अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाल्याची माहिती ट्विट करताना अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केले आहे. या ट्विटमध्ये दोघांचा हसत असल्याचा फोटोदेखील आहे. ट्विटमध्ये खेर यांनी म्हटले, की मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे, हे मला माहित आहे. पण माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहीन असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. त्याने ४५ वर्षांच्या मैत्रीनंतर अचानक पूर्णविराम घेतला आहे.. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच पूर्ण होणार नाही! ओम शांती!
सतीश कौशिक यांनी विनोदी कलाकार म्हणून चांगले नाव कमविले आहे. त्यांनी दिग्दर्शक, विनोदी पटकथाकार, निर्माता म्हणून देखील बॉलीवुडमध्ये जम बसविला आहे. त्यांचा हरियाणामध्ये 13 एप्रिल 1965 रोजी जन्म झाला 1987 मध्ये आलेल्या मिस्टर इंडिया चित्रपटात त्यांची कॅलेँडर ही भूमिका चांगलीच गाजली. 1997 मध्ये आलेल्या दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजरची भूमिकेची समीक्षकांनी चांगले कौतुक केले. अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांना नुकतेच कोरोना झाली लागण झाली होती. त्यांनी 17 मार्च रोजी त्कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. काही दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी योग्य काळजी घेण्यासाठी धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पटकथालेखक ते विनोदी कलाकार असा प्रवासअनुपम खेर आणि सतिश कौशिक यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून एकत्रित शिक्षण घेतले आहे. कुंदन शाह यांच्या कॉमेडी 1983 मध्ये जाने भी दो यारो ही मालिका गाजली होते. फार कमी लोकांना माहित आहे, त्याचे संवाददेखील त्यांनी लिहिले आहे. पटकथालेखक म्हणून नाव चांगले गाजत असताना त्यांनी अभिनेता म्हणून नशीब आजमावले. त्यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच पसंतीस पडल्या आहे. दोनवेळा उत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी १९९३ मध्ये दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट रुप की राणी चोरों का राजा कमालीचा अपयशी ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रीदेवी ही मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर काही वर्षे त्यांची संघर्षात गेली होती.
चाहत्यांनी व्यक्त केला शोकसतिश कौशिक यांच्या निधनानंतर चाहत्यांनी ट्विटवर श्रद्धांजली वाहिली आहे. कॅलेंडर, पप्पू पेजर असे विविध रोल करणारे अभिनेते जाणे निराशाजनक आहे. तुम्ही आमच्या ह्रदयात स्मरणात राहाल, असे चाहत्याने म्हटले आहे. दुसऱ्या एका चाहत्याने त्यांच्या विनोदी भुमिकांचे कौतुक केले आहे. चित्रपटांमधील आपल्या विविध पात्राद्वारे त्यांनी हसविलेच नाही तर तोच आनंद सामान्यांच्या जीवनातही पसरविला. त्यांच्या आठवणी कायम राहतील, असे चाहत्याने ट्विट कॉमेंटमध्ये म्हटले आहे.