मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला ( Bollywood superstar Shah Rukh Khan ) मुंबई विमानतळावर कस्टम विभागानने ( Shah Rukh Khan interrogated customs department ) शुक्रवारी रात्री अडवले होते. विमानतळावर तैनात एअर इंटेलिजेंस युनिट म्हणजेच एआययूच्या सूत्रांनी सांगितले की, शाहरुख खान शुक्रवारी रात्री शारजाहून परतला होता. त्याच्याकडे महागडी 18 लाख रुपायांची घड्याळे होती. या घड्याळांसाठी शाहरुखला ६.८३ लाख रुपये कस्टम ड्युटी ( Shah Rukh Khan paid customs duty ) भरावी लागली.
शाहरुख खानकडे महागाडी घड्याळे - शाहरुख खान शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईला पोहोचला. पहाटे एक वाजताच्या सुमारास येथील टी-३ टर्मिनलवर रेड चॅनल ओलांडत असताना शाहरुख खानसह त्याची टीम कस्टमने थांबवली. त्याच्या बॅगेत बाबून, झुर्बक घड्याळाची तपासणी केली असता, रोलेक्स घड्याळाचे 6 बॉक्स, स्पिरिट ब्रँडचे घड्याळ, ऍपल सिरीजची घड्याळे आढळून आली. यासोबत घड्याळांचे रिकामे बॉक्सही सापडले होते. शाहरुख खान शनिवारी पहाटे 5 वाजता चौकशी झाल्यानंतर मुंबई विमानतळातून बाहेर पडला. त्यांच्यासोबत त्याची व्यवस्थापक पूजा ददलानी देखील होती.
अंगरक्षकाने दंड भरला-विमानतळावर तासाभराच्या ऑपरेशननंतर शाहरुख, त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र शाहरुखचा अंगरक्षक रवी तसेच टीमच्या इतर सदस्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखचा बॉडीगार्ड रवीने 6 लाख 87 हजार रुपये कस्टम ड्युटी भरली. सीमाशुल्क विभागाची ही प्रक्रिया शनिवारी सकाळपर्यंत चालली. सकाळी आठच्या सुमारास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कस्टम अधिकाऱ्यांनी रवीची सुटका केली. दंडाची रक्कम शाहरुखच्या क्रेडिट कार्डवरूनच भरण्यात आल्याचेही अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
पुस्तक लाँचसाठी किंग खान गेला होता दुबईला - शाहरुख 11 नोव्हेंबरला यूएईमधील एक्स्पो सेंटरमध्ये पोहोचला. शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर 2022 च्या 41 व्या आवृत्तीत भाग घेतल्याबद्दल त्यांना ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा आणि कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शाहरुखने त्याच्या टीमला एका खासगी चार्टर्ड विमानातूनही नेले. या विमानाने ते शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता मुंबईला परतले.