मुंबई- सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे १ वाजून ५२ मिनिटांनी हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सरोज खान यांना 17 जून रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने, वांद्रे येथील गुरूनानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यात त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यांची प्रकृती स्थिर होती. पण त्यांना शुक्रवारी पहाटे 1 वाजून 52 मिनिटांनी हृदय विकाराचा झटका आला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरोज खान यांच्यावर आज(शुक्रवारी) सकाळीच मालाडमधील क्रबस्तानमध्ये अंत्यसंस्कार पार पडले आहेत.