मुंबई -गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील एका पीडित मुलीसोबत मोबाईलवरून अश्लील भाषेत संभाषण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सिक्युरीटी गार्डला मुंबई पोलिसांच्या वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विजय कुमार उमाशंकर गुप्तता (वय ३५) असे असून हा आरोपी हरियाणा येथील गुरगाव सिक्युरीटी म्हणून काम करत होता.
मोबाईलवरून महिलांशी अश्लील संवाद साधणाऱ्या सिक्युरीटीला हरयाणातून अटक हेही वाचा - सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद
मंगोलिया को ऑप हौसिंग सोसायटीत हा आरोपी काम करत होता. सोसायटीत भेटीसाठी येणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी एक डिजिटल अॅप तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये सोसायटीत येणाऱ्या व्यक्तींचे नाव व मोबाईल क्रमांकाची नोंद करण्याचे काम आरोपी करत होता. मोबाईल क्रमांकावर महिलांना संपर्क साधून आरोपीने त्रास द्यायला सुरूवात केली. आपण पकडले जाऊ नये म्हणून आरोपीने चोरीचा मोबाईल व सिमकार्ड सुद्धा मिळवले होते.
हेही वाचा - संतापजनक! मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पीडित महिलांना आरोपी रात्री अपरात्री फोन करून अश्लील भाषेत संवाद साधत होता. अशाच एका मुंबईतील पीडितेला जुलै ते सप्टेंबर या दरम्यान या आरोपीने त्रास देण्यास सुरवात केल्यानंतर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी काही पथक आरोपीच्या तपास कामासाठी तयार करून तब्बल १७ दिवस दिल्ली, गुरगाव, हरयाणा सारख्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला होता. तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी आरोपी विजयकुमार याला गुरुग्राममधून अटक केली.