मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी दिल्याबद्दल एका आरोपीला मुंबईत अटक करण्यात आली आहे . कामराण अमीन खान (वय-25) अस अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्यास चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपीला मुंबईतील न्यायालयात ट्रांजिस्ट रिमांडसाठी हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची रवानगी 28 मे पर्यंत ट्रांजिस्ट रिमांडमध्ये केली आहे. सध्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी प्रकरणी आरोपीला 28 मे पर्यंत ट्रांजिस्ट रिमांड - uattar pradesh police
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बस्फोट घडवून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यासाठी लखनऊ पोलीस मुख्यालयाच्या सोशल मीडिया डेस्कवर दोन धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, २२ मे रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊच्या गोमतीनगर पोलीस ठाण्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बस्फोट घडवून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यासाठी लखनऊ पोलीस मुख्यालयाच्या सोशल मीडिया डेस्कवर दोन धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास करणार्या उत्तर प्रदेश एसटीएफला हा फोन करणारा आरोपी मुंबईचा असल्याचे समजले. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसला त्याविषयी माहिती देण्यात आली होती . महाराष्ट्र एटीएसने कामराण या आरोपीला मुंबईतील चुना भट्टी भागातून अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफला दिले आहे.