महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accused Arrested: डबल मर्डर प्रकरणातील आरोपीस तीस वर्षानंतर अटक - आरोपीस तीस वर्षानंतर अटक

लोणावळा येथील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी 30 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 ने अटक केली आहे. आरोपी आपले नाव आणि ओळख लपवून मागील अनेक वर्षांपासून मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहत होता.

Accused Arrested
Accused Arrested

By

Published : Jun 16, 2023, 8:42 PM IST

मुंबई :अविनाश भिमराव पवार (49 वर्षे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो विक्रोळी परिसरात टुरिस्ट गाडी चालवण्याचे काम करत होता.मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील यशोधा बंगला, सत्यम सोसायटी, याठिकाणी वयोवृध्द असलेले दाम्पत्य धनराज ठाकर्सी कुरवा (वय ५५ वर्षे) व त्यांची पत्नी धनलक्ष्मी धनराज कुरवा (वय ५० वर्षे) यांचा त्यांचे घरात घुसून दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व धारधार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. लोणावळा शहर पोलिसांनी अमोल जॉन काळे उर्फ टिल्लु व विजय अरुण देसाई या दोघांना अटक केली होती; मात्र मुख्य आरोपी अविनाश भिमराव पवार (१९ वर्षे) फरार झाला होता. लोणावळा पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु पाहिजे असलेला आरोपी मिळून आला नाही.

गुप्त माहितीच्या आधारे अटक :आरोपीसंदर्भात मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखा 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली. आरोपी स्वत:चे मूळ नाव व ओळख बदलून मुंबईत वावरत आहे. माहिती मिळाल्यावरून पथक नेमून आरोपीवर पाळत ठेवून त्याची माहिती मिळविली. आरोपीची एकंदरीत वागणूक संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन तपास केला असता आपले नाव अविनाश भिमराव पवार असे सांगितले. लोणावळा पोलीस ठाणे गु.र. क्र.८०/१९९३ कलम ३०२, ३४ भादवि मधील फरार आरोपी असल्याचे व तो सध्या नाव बदलून अमित भिमराज पवार या नावाने विक्रोळी पूर्व, मुंबई ८३ याठिकाणी राहत असल्याची कबुली दिली आहे.


कर्नाटकात मुलीने आईचा गळा दाबून केला खून: आईचे आणि सासूचे रोज भांडणे होत असल्याच्या रागातून मुलीने आईचा गळा दाबून खून करत मृतदेह सूटकेसमध्ये भरुन पोलीस ठाणे गाठले. ही धक्कादायक घटना बंगळुरुमधील मायको लेआऊट पोलीस ठाण्याच्या परिसरात सोमवारी रात्री घडली. सेनाली सेन असे आईचा खून करणाऱ्या मुलीचे नाव आहे. तर बीवा पॉल असे खून झालेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. सेनाली ही उच्च शिक्षित असून तिने मास्टर ऑफ फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले आहे.

आई आणि सासूचे रोज सुरू होते भांडण :सेनाली मूळची कोलकाता येथील आहे. सेनालीने मास्टर ऑफ फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगा आहे. मायको लेआऊटमधील एका खासगी अपार्टमेंटमध्ये सेनाली तिच्या कुटुंबासह सहा वर्षांपासून राहत आहे. मात्र तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर आईची जबाबदारीही सेनालीवर येऊन पडली. त्यामुळे सेनालीने आईला पतीच्या घरी आणले होते. मात्र त्याच घरात राहणाऱ्या सेनालीची आई आणि सासू यांच्यात रोज भांडण होत असे. या भांडणाला सेनाली खूप कंटाळली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details