मुंबई : शहरातील तळोजा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमध्ये महिलेसमोर एक नराधमाने अश्लील कृत्य (obscene acts in front of woman) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असल्याने पोलिसांनी या आरोपीस अटक (Accused arrested) केली आहे. महिला नेहमीप्रमाणे कामावर जात असताना ही घटना घडली.
Mumbai Crime : नराधमाने महिले समोर लिफ्टमध्ये केले अश्लील कृत्य; आरोपीस अटक, घटना सीसीटीव्हीत कैद... - obscene acts in front of woman
महिलेला लिफ्टमध्ये पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाची विचित्र कृती (obscene acts in front of woman) सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरातील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. (Mumbai Crime)
अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न : संबंधित तळोजा परिसरातील महिला सकाळी कामावर जात होती. त्यावेळी त्याच इमारत राहत असलेल्या तरुण लिफ्टमध्ये आला, संबंधित महिला व तरूण दोघेच लिफ्टमध्ये होते. लिफ्ट मध्ये महिलेला एकटी पाहून संबंधित तरुणाने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. एकाएकी झालेला हा प्रकार पाहून संबंधित महिला घाबरली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून सोशल मीडियावर देखील वायरल झाली आहे.
पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात : तरुणाचे लिफ्टमधील अश्लील कृत्य पाहून संबंधित महिला घाबरली व तिच्या घरी गेली. मात्र तरुण करत असलेले अश्लील कृत्य हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. ही घटना सहा डिसेंबरची आहे. यानंतर तब्बल या घटनेला एक महिना लोटल्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे संबंधित महिलेने तळोजा पोलीस स्टेशन गाठले व अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद केला. पोलिसांनी देखील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले (Accused arrested) व गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे.