महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंग्या तलवारी घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक; पोलीस हवालदार जखमी - mumbai police Vinod Mahatre

देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री विनोद म्हात्रे गस्त घालत होते. यावेळी टाटानगरमध्ये नंग्या तलवारी घेऊन फिरणाऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्नात ते जखमी झाले. या दुर्घटनेत थोडक्यात विनोद यांचा डोळा वाचला.

पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला
पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला

By

Published : Dec 17, 2020, 1:00 PM IST

मुंबई - देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाटानगरमध्ये नंग्या तलवारी घेऊन फिरणाऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्नात पोलीस हवालदार विनोद म्हात्रे जखमी झाले आहेत. विनोद म्हात्रे यांनी निडरपणे आरोपींचा सामना करत एका आरोपीला अटक केली आहे. या दुर्घटनेत थोडक्यात विनोद यांचा डोळा वाचला. पोलिसांनी हसमत अली शेख (19) या आरोपीला अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्रपाळीवर विनोद म्हात्रे गस्त घालत होते. यावेळी विनोद म्हात्रे यांना तीन जण भरधाव दुचाकी चालवून हातात नंग्या तलवारी घेऊन टवाळखोरी करत असल्याचे दिसले. आरोपींचा पाठलाग करत विनोद म्हात्रे यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन आरोपींना पळ काढला तर तिसऱ्याने आरोपीने बिअरची बाटली विनोद यांच्या दिशेने भिरकावली. बिअरची बाटली डोक्यात फुटल्याने विनोद म्हात्रे जखमी झाले. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेतही विनोद यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले.

हेही वाचा -काश्मीरमध्ये एक अतिरेकी ताब्यात; तर पंजाबमध्ये दोघांचा खात्मा..

ABOUT THE AUTHOR

...view details