महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Monsoon Session 2023: खारघर दुर्घटने प्रकरणी सभागृहात आरोप प्रत्यारोप - महाराष्ट्र भूषण पुरस्कार

नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेचे जोरदार पडसाद आज सभागृहात उमटले. प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान या प्रश्नावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तर विरोधक शूद्र राजकारण करत असल्याचा आरोप सरकारने केला.(Monsoon Session 2023)

case of the Kharghar accident
खारघर दुर्घटने प्रकरणी सभागृहात आरोप प्रत्यारोप

By

Published : Jul 20, 2023, 2:35 PM IST

मुंबई :नवी मुंबईतील खारघर येथील आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे नियोजन ढिसाळ असल्याचा आरोप विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केला नियोजन शून्य आयोजनामुळे उष्माघात आणि चेंगराचेंगरीत सतरा जणांचा मृत्यू झाला. त्याला सरकार जबाबदार असून मनुष्यधाचा गुन्हा याप्रकरणी दाखल करावा अशी मागणी णी आमदार सुनील प्रभू आणि जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

या संदर्भात शासनाने नेमलेल्या चौकशी समितीला दिलेली मुदतवाढ कशासाठी आहे तीन महिने चौकशी अहवाल का समोर येत नाही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करणारा कोण शहाणा आहे, हे समोर येऊ द्या अशा शब्दात जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले.

या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की कार्यक्रमाचे नियोजन अतिशय योग्य झाले होते ३०६ एकर मध्ये श्री भक्तांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती. श्री भक्तांच्या म्हणन्यानुसारच कार्यक्रम सकाळी घेण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारची हलगर्जी शासनाकडून करण्यात आलेली नाही.

आयोजनामध्ये कोणतीही चूक नव्हती त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची आवश्यकताच नाही. ही केवळ दुर्घटना होती आणि अशा वेळेस सर्वांनी एकत्र येऊन त्या घटनेकडे दुर्घटना म्हणून पाहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. मात्र मुनगंटीवार यांच्या उत्तराने विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी करत मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चालूच ठेवली.

अशा घटनांचे उत्तर त्याच खात्याचा मंत्री कशासाठी देतो सांस्कृतिक खात्याच्या मंत्राने उतर न देता गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. मात्र विरोधकांनी प्रश्न विचारताना उत्तर सांस्कृतिक खात्याकडे मागितले आहे. त्यामुळे गृह खात्याने उत्तर द्यायचा प्रश्नच येत नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर विरोधक या प्रश्नाचे राजकारण करीत असून अतिशय कद्रू मनाचा विरोधी पक्ष आपल्याला लागला आहे दुर्दैव आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली.

हेही वाचा :

  1. Maharashtra Monsoon session Updates: जीएसटी कायद्यामध्ये बदल करण्यासाठी देशातील अर्थमंत्र्यांच्या बैठकीत मुद्दा मांडणार-अजित पवार
  2. Devendra Fadnavis on Raigad Landslide: जास्त पाऊस होत असल्याने मदतकार्यात अडथळे-देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details