महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 22, 2023, 9:57 AM IST

ETV Bharat / state

Mumbai Crime News: गांधी रुग्णालयातील डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल; बेहिशोबी मालमत्ता केली होती जमा

महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर गजानन तुळशीराम भगत यांच्याविरुद्ध मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केला आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी परळ येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस तपास करत आहेत.

Mumbai Crime News
डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई:मुंबईतीलपरळ येथे डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन तुळशीराम भगत असे डॉक्टरचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीसांकडून सांगण्यात आले की, गांधी रुग्णालयातील डॉक्टर गजानन भगत यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा २७ लाख ६४ हजार ५२६ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने गजानन भगत यांची लवकरच संबंधित अधिकार्‍यांकडून चौकशी करुन जबाब नोंदविण्यात येणार आहे. परळ येथे प्रसिद्ध अशा महात्मा गांधी स्मारक रुग्णालय आहे. तिथेच डॉ. गजानन भगत हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १ फेब्रुवारी २००८ ते ४ जुलै २०१६ या कालावधीत तिथे कर्तव्य बजावित असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पोलीस तपास करत आहेत: आता गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. लवकरच त्यांची लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीसांकडून चौकशी होणार असून जबाब नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस तपास करत आहेत. डॉक्टर गजानन भगत हे 2008 ते 2016 या कालावधीत परळ येथील गांधी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होते. एकाच ठिकाणी इतका दीर्घकाळ डॉक्टर गजानन भगत हे राजकीय वरदहस्ताने कर्तव्य बजावत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय किंवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


तपास केला सुरु: मार्गाने बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी तक्रार अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाला होता. या तक्रार अर्जानंतर या अधिकार्‍यांनी त्याची शहानिशा करुन तपास सुरु केला होता. तपासादरम्यान गजानन भगत यांनी भष्ट्र आणि गैरमार्गाने २७ लाख ६४ हजार ५२६ रुपयांची मालमत्ता केल्याचे उघडकीस आले होते. हे बेहिशेबी मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी पट जास्त होती. तपासाचा हा अहवाल सादर केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन आता डॉ. गजानन भगत यांच्याविरुद्ध कलम १३ (१), (ई), १२ (२) भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा:Mumbai Crime News हॉटेलमध्ये कच्चा पुलाव देण्यावरून झाला वाद चाकूने केला हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details