महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्य रेल्वेची एसी लोकल ३० जानेवारीपासून सेवेत - एसी लोकल

या लोकलच्या सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही गाडी रुळांवर धावण्यास सज्ज झाली आहे. ३१ जानेवारीपासून ठाणे ते वाशी, नेरुळ, पनवेल दरम्यान नियमित दिवसाला १६ फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Mumbai local
सांकेतिक छायाचित्र

By

Published : Jan 24, 2020, 7:07 PM IST

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली मध्य रेल्वेची एसी लोकल येत्या ३० जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)येथून एसी लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेची एसी लोकल ३० जानेवारीपासून सेवेत

हेही वाचा - नोव्हेंबरमध्ये १४ लाख ३३ हजार नव्या नोकऱ्यांची निर्मिती; ईएसआयसीचा दावा

ट्रान्स हार्बर मार्गावर उद्घाटनाची पहिली फेरी पनवेल ते ठाणे दरम्यान होणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारीपासून एसी लोकलच्या नियमित फेऱ्या होतील. मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये डिसेंबर २०१९ रोजी चेन्नई येथील आयसीएफ कारखान्यातून एसी लोकल दाखल झाली आहे. या लोकलच्या सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही गाडी रुळांवर धावण्यास सज्ज झाली आहे. ३१ जानेवारी पासून ठाणे ते वाशी, नेरुळ, पनवेल दरम्यान नियमित दिवसाला १६ फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा - मी असा किती दिवस मार खाऊ? वृद्धेच्या प्रश्नाने जयंत पाटील भावूक

एसी लोकलचे तिकिट दर

ठाणे ते वाशी - १३० रुपये
ठाणे ते पनवेल - १७५ रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details