महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक जिंकण्यासाठी मोदी- शाह कोणत्याही थराला जाऊ शकतात, प. बंगालमधील हिंसेच्या चौकशीची सपाची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची जोडगोळी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काहीही करू शकते. त्यामुळे जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच पश्चिम बंगाल मध्ये दंगा केला का? असा सवाल करत या दंग्याची चौकशी करण्याची मागणी समाजवादी पार्टीने केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांनीच पश्चिम बंगालमध्ये दंगा केला का? समाजवादी पार्टीचा सवाल

By

Published : May 15, 2019, 3:29 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची जोडगोळी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काहीही करू शकते. त्यामुळे जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच पश्चिम बंगालमध्ये दंगा केला का? असा सवाल करत या दंग्याची चौकशी करण्याची मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी बंगालच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना भाजपवर ठपका ठेवला आहे.

भाजप कार्यकर्त्यांनीच पश्चिम बंगालमध्ये दंगा केला का? समाजवादी पार्टीचा सवाल

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी शाह यांच्या प्रचारादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत आणि जाळपोळीत झाले. या घटनेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातही समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत दंग्याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला कोणताही जनाधार नाही. भावनिक मुद्यावर निवडणूक लढवत तिथे जनाधार मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचेही आझमी म्हणाले.

दरम्यान, लोकसभेच्या प्रचारासाठी कोलकात्यात शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने या सभेला परवानगी नाकारल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सरकारबाबत रोष असल्याचे सांगितले जाते. सभेची परवानगी नाकारल्यानंतर शाह यांनी रोड शो करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऐन रोड शो दरम्यान गोंधळ झाल्याने शाह यांना आपला कार्यक्रम सोडून माघारी परतावे लागले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details