मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एकच दिवस झाला असताना भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर आता आमदार आशिष शेलार यांनीही नवीन सरकारवर निशाणा साधला आहे. सत्यमेव जयतेची घोषणा देत स्थापन झालेल्या ३ चाकी सरकारने पहिल्याच दिवशी असत्यमेव जयतेचा कारभार सुरु केल्याचे वक्तव्य शेलार यांनी केले आहे.
तीन चाकी सरकारचे पहिल्याच दिवशी 'असत्यमेव जयते', शेलारांचा निशाणा - शेलारांचा नवीन सरकारवर निशाणा
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एकच दिवस झाला असताना भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर आता आमदार आशिष शेलार यांनीही नवीन सरकारवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा सधाला. राज्यपालांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली आहे. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावल्या अधिवेशनात हंगामी अध्यक्ष बदलण्याची भूमिका या सरकारने घेतली आहे. ही बाब सभागृहाच्या नियमात बसणार नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
सरकारकडे बहुमत तर आमदारांवर अविश्वास का?
नव्या सरकारकडे जर बहुमत आहे तर आमदारांवर अविश्वास का असा सवाल शेलार यांनी केला आहे. स्वत:च्या आमदारांना डांबून ठेवणे यात कुठले आले सत्यमेव जयते? असे काय दडलंय या प्रकियेत? असे सवाल शेलार यांनी केले आहेत.