मुंबई- महाविकास आघाडी सरकारने आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र, ही स्थगिती दिल्यानंतरही मेट्रो कारशेडच्या ठिकाणी काम सुरूच असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी केला आहे.
स्थगितीनंतरही 'आरे' मेट्रो कारशेडचे काम सुरूच - संजय निरुपम - आरे मेट्रो कारशेड
आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतरही काम सुरूच असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी केला आहे.
संजय निरुपम यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील मेट्रो 3 च्या रॅम्पचे काम सुरू असलेल्या ठिकाणी शुक्रवारी पाहणी केली. पूर्वीपासून आरेत मेट्रो कारशेड होण्यास सर्वांनीच विरोध दर्शविला होता. शिवसेनेने सत्तेत आल्यावर आरेत कारशेड होऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यानुसार आता सत्तेत आल्यावर ठाकरे सरकारने आपला दिलेला शब्द पाळावा, असे संजय निरुपम यांनी सांगितले.
एक प्रकारे आरेतील मेट्रो कारशेडच्या ठिकाणी रॅम्पचे काम सुरू ठेवून सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही निरुपम यांनी यावेळी केला.