मुंबई-शेकडो कोटींचे बजेट असूनही 'मुंबई' तुंबतेच कशी, असा प्रश्न आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे." मुंबईचा स्ट्रोम वॉटर ड्रेन हा प्रकल्प गेली अनेक वर्षे अपूर्ण आहे. पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी 1062 कोटी इतका फंड आतापर्यंत उपलब्ध केला गेला आहे. हे पैसे नेमके कुठे खर्च झाले याची चौकशी झाली पाहिजे" अशी मागणी आपचे राष्ट्रीय सह-सचिव रूबेन मास्करेहनस यांनी केली आहे.
महापालिकेतर्फे मुंबईतील नागरिकांची दरवर्षी फक्त आश्वासनांवर बोळवण केली जाते. पावसाळ्यात सकल भागात साचणाऱ्या पाण्याला पंपिंग द्वारे बाहेर काढण्यासाठी दर वर्षी शेकडो कोटींचे बजेट असून देखील 2 दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबईची तुंबई झाली आहे. महापालिकेने केलेले सर्व दावे यावेळी फोल ठरले आहेत. एवढे पैसे खर्च करून देखील वर्षानुवर्षे हीच परिस्थिती राहण्यामागे महापालिकेचा गैरकारभारच असल्याचा आरोप आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आला आहे.