महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आझाद मैदानात; आश्वासन पूर्ण न केल्याने आंदोलन

केंद्र सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधनासाठी काही महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे या वाढीव मानधनासाठी तसेच इतर विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आझाद मैदान येथे आंदोलनासाठी आले आहेत.

राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आझाद मैदानात

By

Published : Jun 11, 2019, 3:22 PM IST

मुंबई- केंद्र सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधनासाठी काही महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे या वाढीव मानधनासाठी तसेच इतर विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका आझाद मैदान येथे आंदोलनासाठी आले आहेत.

राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आझाद मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुपटीने वाढ केली होती. ही मानधन वाढ नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून दिले नाही. केंद्राचा आदेश असतानाही राज्य सरकार याची अंमलबजावणी करत नसल्याचे संतप्त अंगणवाडी सेविकांनी सांगितले.

केंद्र शासनाकडून अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसाठी अगोदरच पैसे आलेले आहेत. परंतु राज्य शासनाने ते थांबवलेले आहेत. तसेच राज्य शासन मुद्दाम अंगणवाडी सेविकांचे मानधन त्यांना देत नाही, असा अंगणवाडी कर्मचारी समितीचा आरोप आहे.

कर्मचाऱ्यांना मासिक ५ हजार रुपये पेन्शन योजना लागू करा, वर्षातून १५ दिवसांची आजारपण आणि भरपगारी रजा हवी, सेवासमाप्ती लाभाच्या रकमेत तिपटीने वाढ करा, अंगणवाडी सेविकांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्या अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी केल्या. परंतु सरकारने फक्त आश्वासन दिले. ते पण पूर्ण केले नाही.

त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी पुन्हा एकदा आपल्या मागण्यावर आवाज उठवण्यासाठी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. जर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अधिवेशन काळात तीव्र आंदोलन करू, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सचिव ब्रिजपाल सिंह यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details