मुंबई- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे मुंबईतील सर्वच उमेदवार आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबईत ६ जागांसाठी निवडणूक होत आहे.
मुंबईत आज काँग्रेस उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करणार - संजय निरुपम
काँग्रेस उमेदवार आज मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन... उर्मिला मांतोडकर संजय निरुपम, प्रिया दत्त , मिलिंद देवरा चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज... २९ मार्चला होणार आहे चौथ्या टप्प्यातील मतदान
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण येत्या २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार ९ एप्रिल आहे. काँग्रेसचे सर्व उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत आपले अर्ज दाखल करणार आहेत. त्यामध्ये एकनाथ गायकवाड (दक्षिण मध्य), संजय निरुपम (उत्तर पश्चिम), मिलिंद देवरा (दक्षिण), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई) आणि प्रिया दत्त (उत्तर मध्य) मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.