- 4:26 PM - नाशिक वणीच्या रस्त्यावर दुचाकींचा भीषण अपघात... तीन युवकांचा मृत्यू ...ओव्हर टेक करताना दुचाकींचा समोर समोर झाला अपघात ..मृत झालेले युवक वणी परिसरातील
- 4:08 PM नाशिक- बोरगड येथील न्यू ग्रेस अकॅडेमीच्या एका शिक्षिकेला आणि 74 मुलांना शरीरावर खाज तर काहींना उलट्यांचा त्रास...जिल्हा शासकीय रुग्णालयात शाळा प्रशासनाने केले दाखल...शाळा परिसरात असलेल्या किड्यांनी चावा घेतल्याने हा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती...तर शाळा परिसरातील पिण्याच्या पाण्याने हाथ धुतल्याने हा प्रकार होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
- 3:57 मुंबई - मेट्रो आणि पंतप्रधान आवास योजनेचा एकाच कंत्राटदाराला कंत्राट...नवी मुंबईत १४ हजार कोटींची घरे बनवण्याच्या योजनेत केवळ चार लोकांना कंत्राट देण्यात आले...हे कंत्राट देण्यासाठी अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले...मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका... सर्व कंत्राट आणि कंत्राटदारांची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी.
- 3:40 PM हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी...शेतकऱ्यांना दिलासा
- 3:31 PM रायगड - रोहा तालुक्यातील दिव गावातील शासकीय जमीन घोटाळ्याची विशेष अधिकारी नेमून होणार चौकशी...दिव ग्रामस्थांना संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन...चौकशीमुळे अधिकारी, दलालांचे धाबे दणाणले
- १०.४६ AM : हिंगोली - रुग्णवाहिकेत असणारे डॉक्टर नशेत राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
- १०.४५ AM : मुंबई - इम्पॅक्ट इंडिया फौंडेशन आणि रेल्वेच्या संयुक्त सहकार्याच्या माध्यमातून मागील २८ वर्षांपापूर्वी सुरू केलेल्या जीवनरेखा एक्स्प्रेसने आत्तापर्यंत १२ लाख ३२ हजार ३२ रुग्णांवर उपचार केले.
- १०.४० AM : नागपूर- आई रागावल्याने दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह नवेगाव शिवारातील गाळात फसलेला आढळून आला. मनीषलाल बहादूर पटले असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.
- १०.३६ AM : वर्धा -कारंजा (घाडगे) तालुक्यातील गारपीट येथे शाळा, महाविद्यालयाच्या वेळेवर बसफेरी सोडण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले. बस वेळेवर सोडण्याच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
- १०.१९ AM : वर्धा - पावसाला सुरुवात झाली आहे.
- ८.५१ AM : ठाणे - शहापूर तालुक्यातील सोगाव अंगणवाडी मुलांना फॉलिक अॅसिड टॅनिकचा ओव्हरडोस दिल्याने १३ मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सर्व मुलांवर उपचार सुरू आहेत.
- ६.३३ AM : मुंबई- पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात मुंबईतील एका प्रतिष्ठित बिल्डरने संजय बर्वे यांच्या विरोधात आर्थिक व मानसिक त्रास देण्याचा आरोप केला आहे.
- १२.१० AM : अकोला- भाजपचे गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
आज.. आत्ता.. नाशिकमध्ये भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू - aaj atta todays important news
झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
आज...आत्ता...
Last Updated : Aug 29, 2019, 5:08 PM IST