महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचे निधन - aaj atta todays important news

झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

आज...आत्ता...माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे निधन

By

Published : Aug 24, 2019, 12:48 PM IST

Updated : Aug 24, 2019, 1:33 PM IST

  • १.२३ PM - अरुण जेटली यांची आणि माझी मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. त्यांच्या जाण्याने मी एक जवळचा मित्र गमावला असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक दुःख व्यक्त केले.
  • १.१५ PM - अरुण जेटली यांचे हुशार वकील, प्रतिष्ठीत मंत्री म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान आहे. आज त्यांच्या जाण्याने दुःख झाले असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी व्यक्त केली.
  • १.०७ PM - अकोल्यात ट्रेलर आणि कंटेनरचा अपघात, दोन जण ठार
  • १२.३7 PM - माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे निधन
  • ११.३३ AM - सोमवारी नागपूरच्या मुंडले शाळेत सरसंघचालक एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. पोलिसांनी वरच्या मजल्यावर सभागृहाच्या दारावर मेटल डिटेक्टर लावले होते. नियमाप्रमाणे मेटल डिटेक्टरजवळ पोलीस उपस्थित राहून सभागृहात येणाऱ्या लोकांची तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, नागपूर पोलीस त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले.
  • 10.16 AM - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफडीचे सत्र सुरूच आहे. मध्यरात्री आकुर्डी परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने 15 वाहनांची केली तोडफोड केली. तसेच एकाला मारहाण करून लुटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
  • १०.०० AM - बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्ताने विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • ९.२३ AM - काल दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत.
  • ७.१८ AM - व्हीसीलिंगवूडसमध्ये विजेता सिनेमच्या टीमने दहीहंडी साजरी केली.
  • ७.०० AM - भिवंडी महापालिका क्षेत्रातील पिरानी पाडा भागातील गैबी नगर येथील चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला तर 6 गंभीर जखमी झाले.
Last Updated : Aug 24, 2019, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details