महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aaditya Thackeray Reply PM Modi : भाजपचा मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डोळा; आदित्य ठाकरेंचे पीएम मोदींना प्रत्युत्तर

मुंबईकरांच्या कराचे पैसे मुंबईकरांच्या सेवेसाठी लागले गेले पाहिजेत. ते केवळ बँकेत ठेवून उपयोग नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जाहीर सभेतून ठाकरेंना लगावला होता. मात्र, यावरून आता आदित्य ठाकरे यांनीदेखील पलटवार करीत, कालच्या जाहीर सभेतून भारतीय जनता पक्षाचा मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर आणि मुंबईकरांच्या पैशांवर डोळा असल्याचे सिद्ध झाले आहे, असा टोला लगावला.

Aaditya Thakerey Reply to PM Modi Statement On BMC Tax Money
भाजपचा मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डोळा; आदित्य ठाकरेंचे पीएम मोदींना प्रतित्युत्तर

By

Published : Jan 20, 2023, 8:48 PM IST

Updated : Jan 20, 2023, 9:10 PM IST

आदित्य ठाकरेंचे पीएम मोदींना उत्तर

मुंबई :राज्यात मुंबई महानगरपालिका वगळता इतर कोणत्याही महानगरपालिकेकडे ठेवी शिल्लक राहिलेल्या नाहीत. नागपूर महानगरपालिका असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल या महापालिकांना कोणत्याही कामासाठी राज्य सरकारकडे पैसे मागावे लागतात. मात्र, मुंबई महानगरपालिकेचे तशी अवस्था नाही. मुंबई महानगरपालिका स्वतःच्या पैशांवर काम करू शकते, असेही स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आले. या पैशांच्या माध्यमातून महानगरपालिकेची अनेक मोठी कामे केली जातात. कोस्टल रोड, एसटीपी, बेस्ट सेवा अशी कामे अशी कामे या पैशांतून केली जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आज वरळी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

जगाच्या कोणत्याही शहरात 100% काँक्रिटीकरण नाही :राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील चारशे किलोमीटरचे रस्ते काँक्रिटीकरणाचे आदेश दिले आहेत. मात्र, थेट आदेश देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्याचा अभ्यास करणे गरजेचे होतं. जगभरातल्या कोणत्या शहरामध्ये शंभर टक्के काँक्रिटीकरण करण्यात आलेलं नाही. तसेच आपण या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तीन मुद्द्याबाबत अद्यापही महानगरपालिकेकडून कोणत्याच उत्तर आलेलं नाही. तसेच रस्त्याच्या काँक्रिटी करण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपये लागणार आहेत हा पैसा नेमका कुठून उभा केला जाणार हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही असा आरोप पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.

एसटीपीची कामे शिंदे सरकारने लांबवली :एसटीपी प्रकल्पातील कामे सर्वोच्च न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळेच लांबली गेली होती. जवळपास दहा वर्षे याबाबत सर्वोच्च न्यायालयात नियम तयार केले जात होते. मात्र, निर्णय लागल्यानंतर लगेचच महाविकास आघाडी सरकारने एसटीपी प्रकल्पाबाबतचे काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जून महिन्यात सरकार पडल्यामुळेच ती काम होऊ शकली नाहीत. मात्र, सत्तेत आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने सहा महिने का लावले? याबाबतचे उत्तर त्यांनी देणे अपेक्षित असल्यासही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

तैलचित्राच्या अनावरणाला उपस्थित राहण्याबाबत निर्णय नाही :23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्राचे अनावरण विधानसभेच्या मुख्य सभागृहात होणार आहे. मात्र, या अनावरणाला उपस्थित राहायचे का नाही याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी म्हणून सर्व नेते मिळून निर्णय घेणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच, हे पहिले चित्र लागल्यानंतर गद्दारांना कोणाबरोबर गद्दारी केली, कोणाचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला याची आठवण होत राहील, असा चिमटा आदित्य ठाकरे यांनी काढला आहे.


फॉक्स कॉन प्रकल्प आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा प्रयत्न करावे :महाराष्ट्रात येणारा पॉपकॉर्न प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. मात्र, चार ते पाच महिने उलटून गेल्यानंतरही प्रकल्पाबाबत तिथे कोणत्याच हालचाली झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा बॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी हालचाली केल्या पाहिजेत, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, पोस्ट प्रकल्प पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोठेही यावा यासाठी आपण पॉपकॉर्न कंपनीशी पत्रव्यवहार करणार असल्या तरी आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Last Updated : Jan 20, 2023, 9:10 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details