मुंबई - कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एसईबीसी च्या माध्यमातून 12 टक्के शैक्षणिक व 13 टक्के नोकरीत आरक्षण देणे हे क्रांतिकारी असल्याचे अॅड एजाज नक्वी यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणात पुढे जाऊन अर्धा किंवा 1 टक्के असणाऱ्या मुस्लिम मराठा समाजाला स्थान मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
'मराठा मुस्लिम' समाजाला 'या' आरक्षणात सामिल करावे; अॅड एजाज नक्वी यांची मागणी - muslim reservatiom
मराठा आरक्षणाला देण्यात येणाऱ्या आरक्षणात महाराष्ट्रातील मराठा मुस्लिम समाजाचा विचार व्हावा अशी याचिका अॅड एजाज नक्वी यांनी दाखल केली.
मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 4 विरोधी याचिकांसह, 32 मध्यस्थी करणाऱ्या याचिका, मराठा आरक्षणाच्या संदर्भात समर्थन करणाऱ्या 2 याचिका दाखल झाल्या होत्या. यावर तब्बल 42 दिवस दैनंदिन सुनावणी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झाली होती. या दरम्यान मराठा आरक्षणाला देण्यात येणाऱ्या आरक्षणात महाराष्ट्रातील मराठा मुस्लिम समाजाचा विचार व्हावा अशी याचिका अॅड एजाज नक्वी यांनी दाखल केली होती.
यात मराठा आरक्षणात पुढे जाऊन अर्धा किंवा 1 टक्के असणाऱ्या मुस्लिम मराठा समाजाला स्थान मिळावे अशी मागणी अॅड एजाज नक्वी यांनी केली.