महाराष्ट्र

maharashtra

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या धारावीतील 'त्या' व्यक्तीने तबलिगीचा केला होता पाहुणचार

By

Published : Apr 4, 2020, 9:02 PM IST

दिल्लीतील निजामुद्दीन येथून तबलिगी या धार्मिक कार्यक्रमातून परतलेले लोक राज्यभरात अनेक ठिकाणी गेले आहेत. त्यापैकी मुंबईत १२७ लोक आले असून ११७ जणांचा पोलिसांनी मोबाईल जीपीएसद्वारे शोध घेतला आहे. त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

corona mumbai
कोरोना अपडेट

मुंबई- धारावी येथे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या व्यक्तीला कोरोना कसा झाला याचा शोध पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला असता दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी प्रकरण समोर आले. ५ ते ६ तबलिगींनी धारावीतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरी काही दिवस पाहुणचार घेतल्याचे समोर आले आहे. धारावीत आतापर्यंत ४ रुग्ण आढळले असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे तबलिगीकडून धारावीत कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथून तबलिगी या धार्मिक कार्यक्रमातून परतलेले लोक राज्यभरात अनेक ठिकाणी गेले आहेत. त्यापैकी मुंबईत १२७ लोक आले असून ११७ जणांचा पोलिसांनी मोबाईल जीपीएसद्वारे शोध घेतला आहे. त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे. १० जण अद्यापही गायब असून त्यांचा शोध सुरू आहे. या पैकी ५ ते ६ जण १८ मार्चच्या रात्री धारावीत आले. २२ मार्चपर्यंत ते धरावीतील एका व्यक्तीच्या घरामध्ये राहिले. त्याठिकाणी त्यांनी पाहुणचार घेतला. ज्या व्यक्तीच्या घरी तबलिगी राहिले त्या ५६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर धारवी परिसरात एका खासगी डॉक्टर, पालिकेचे सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तसेच एका ३० वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. मृत्यू झालेला व्यक्ती आणि ३० वर्षीय महिला एकाच ठिकाणच्या आहेत. त्यामुळे, धारावीत कोरोना विषाणूचा प्रसार करायला दिल्लीहून तबलिगी जबाबदार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शहरात आलेल्या १२७ पैकी ११७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे विलगीकरण केले आहे. त्यापैकी ५ ते ६ जणांनी धारावीत ४ ते ५ दिवस पाहुणचार घेतला होता. या ४ ते ५ दिवसांच्या वास्तव्यात हे तबलिगी धारावी किंवा आसपासच्या परिसरात कुठे कुठे फिरले, त्यांचा कोणाशी संपर्क आला, मशिदीत नमाजासाठी ते गेले होते का, अशा विविध बाबींचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा-मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या हस्ते 'पर्सनल प्रोटेक्शन कीट'चे वाटप

ABOUT THE AUTHOR

...view details