महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दादरमध्ये पोलीस वसाहतीत आग; १५ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू - mumbai fire

सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटामुळे तीन घरांचे नुकसान झाले आहे.

मुंबई

By

Published : May 12, 2019, 4:19 PM IST

Updated : May 12, 2019, 5:20 PM IST

मुंबई - दादर पश्चिम भवानी शंकर रोडवरील पोलीस वसाहतीत आग लागल्याची घटना घडली. पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीत १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी चव्हाण असे त्या मुलीचे नाव आहे.

सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटामुळे तीन घरांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

मुंबई

मुलीचा मृत्यू की आत्महत्या?

आग लागली तेव्हा घराला बाहेरून कडी लावली असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. घटनास्थळी प्लास्टिकचा डबा सापडला असून त्यातून रॉकेलचा वास येत आहे. मात्र, अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत, असे संपत दराडे (डिव्हिजनल फायर ऑफिसर)

Last Updated : May 12, 2019, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details