मुंबई- मुंबईच्या विकासात मोठा हातभार असलेल्या उपनगरीय लोकल सेवेत मध्य रेल्वेवर वीजप्रवाहावर धावणाऱ्या लोकलला ( Electric Multiple Unit ) आज ( दि. 3 फेब्रुवारी ) 97 वर्षे पूर्ण झाली ( 97 Years Anniversary ) असून 98 व्या वर्षी पदार्पण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस ) ते कुर्ला स्टेशनपर्यंत पहिली विजेवरील लोकल रेल्वे 3 फेब्रुवारी, 1925 रोजी धावली आणि मुंबईच्या विकासाने वेग घेतला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात ईएमयू रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे.
Electric Multiple Unit : मुंबईच्या विकासाला वेग देणाऱ्या रेल्वेच्या 'ईएमयू'ला 97 वर्षे पूर्ण - Electric Multiple Unit
मुंबईच्या विकासात मोठा हातभार असलेल्या उपनगरीय लोकल सेवेत मध्य रेल्वेवर वीजप्रवाहावर धावणाऱ्या लोकलला ( Electric Multiple Unit ) आज ( दि. 3 फेब्रुवारी ) 97 वर्षे पूर्ण होणार ( 97 Years Anniversary ) असून 98 व्या वर्षी पदार्पण करणार आहे. 1925 सालापासून ईएमयूची सुरू झालेल्या सेवेत आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. 4 डब्यांपासून सुरू झालेली धाव आता 15 डब्यांची ईएमयू लोकल धावत आहे. यासह 2020 सालापासून ईएमयू एसी लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळात मध्य रेल्वेच्या मार्गावर 150 लोकल फेऱ्या सुरू होत्या. तर, आता चारही रेल्वे मार्गावर तब्बल एक हजार 774 लोकल रेल्वे फेऱ्या ( Local Train ) धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
पहिला ईएमयूचा इतिहास ( History of Electric Multiple Unit ) - पहिली ईएमयू लोकल 3 फेब्रुवारी, 1925 रोजी तत्कालीन व्हीटी आणि आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लावरून हार्बरमार्गे धावली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात ईएमयू सेवेला सुरुवात झाली. मध्य रेल्वे विभागाद्वारे प्रवाशांना मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर ( नेरुळ/बेलापूर-खारकोपर ) या चार रेल्वे मार्गावर ईएमयूची सेवा देत आहे. 1925 सालापासून ईएमयूची सुरू झालेल्या सेवेत आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. 4 डब्यांपासून सुरू झालेली धाव आता 15 डब्यांची ईएमयू लोकल धावत आहे. यासह 2020 सालापासून ईएमयू एसी लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळात मध्य रेल्वेच्या मार्गावर 150 लोकल फेऱ्या सुरू होत्या. तर, आता चारही रेल्वे मार्गावर तब्बल एक हजार 774 लोकल फेऱ्या धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
- ईएमयू प्रकार ( Types Of Electric Multiple Unit )
- 1925 - हार्बर मार्गावर 4 डबे
- 1927 - मुख्य आणि हार्बर मार्गावर 8 डबे
- 1963 - मुख्य आणि हार्बर मार्गावर 9 डबे
- 1986 - मुख्य मार्गावर 12 डबे
- 1987 - कर्जतच्या दिशेने 12 डबे
- 2008 - कसारा दिशेकडे 12 डबे
- 2010 - ट्रान्सहार्बर मार्गावर 12 डबे
- 2011 - सर्व मुख्य मार्गावर 12 डबे लोकल सेवा
- 2012 - मुख्य मार्गिकेवर 15 डबे
- 2016 - हार्बर मार्गावर सर्व 12 डबे
- 2020 - मुख्य मार्गावर एसी लोकल
- 2021 - हार्बर मार्गावर एसी लोकल
- वर्षानुवर्षे चालविण्यात येत असलेल्या दररोजच्या लोकल फेऱ्या
- 1925 - 150 फेऱ्या
- 1935 - 330 फेऱ्या
- 1945 - 485 फेऱ्या
- 1951 - 519 फेऱ्या
- 1961 - 553 फेऱ्या
- 1971 - 586 फेऱ्या
- 1981 - 703 फेऱ्या
- 1991 - 1 हजार 15 फेऱ्या
- 2001 - 1हजार 86 फेऱ्या
- 2011 - 1 हजार 573 फेऱ्या
- 2018 - 1 हजार 732 फेऱ्या
- 2020 - 1 हजार 774 फेऱ्या
हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत पुन्हा होतेय वाढ; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के