मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांवर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज कोरोनाचे 953 नवे रुग्ण आढळून आले, तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 2 हजार 258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
हेही वाचा -एसटी महामंडळाचा अजब कारभार, प्रशिक्षणार्थी कामगारांना वेतन नाही
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 255 दिवस
मुंबईत आज 953 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 90 हजार 889 वर पोहचला आहे. आज 44 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 352 वर पोहचला आहे. 2 हजार 258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 41 हजार 598 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 32 हजार 925 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 255 दिवस इतका आहे.