मुंबई- शहरात लोकसभेसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच दादर परिसरातील बालमोहन विद्या मंदिर मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एका ९४ वर्षीय आजीबाईने दाखल झाल्या. सुमती जोशी असे त्या आजीबाईचे नाव असून त्यांनी सहकुटुंबीय मतदानाचा हक्क बजावला.
पहिल्या लोकसभेच्या साक्षीदार असलेल्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क - निवडणूक
सुमती जोशी असे त्या आजीबाईचे नाव असून त्यांनी सहकुटुंबीय मतदानाचा हक्क बजावला.
सुमती जोशी
भारताच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी सुमती यांनी मतदान केले होते. त्यात आज होणाऱ्या १७ व्या लोकसभेसाठीही त्यांनी मतदान केले. त्या आज मतदान केंद्राव आपल्या कुटुंबासह आल्या होत्या. मतदान केल्यानंतर भारताच्या प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन सुमती जोशी या आजीबाईने केले. त्यांच्याशी बातचित केले आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी....
Last Updated : Apr 29, 2019, 11:23 AM IST