मुंबई -धारावी परिसरात ८ लाख १७ हजार रुपये संशयित रक्कम आढळून आली. निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाकडून बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही रक्कम ताब्यात घेण्यात आली.
धारावी विधानसभा मतदारसंघात ८ लाखांची संशयित रोकड जप्त - धारावी विधानसभा मतदारसंघ
धारावी विधानसभा मतदारसंघात ८ लाख रुपयांची संशयित रक्कम आढळून आली. याबाबत पुढील तपास निवडणूक आयोग करीत
धारावी विधानसभा मतदारसंघात ८ लाखांची संशयित रोकड जप्त
सायन जंक्शनजवळ पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ही रक्कम आढळली. यासोबतच गाडीमधील धीरेन कांतीलाल छेडा (वय ४२, रा. घाटकोपर) या व्यक्तीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीचे कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहेत काय? याबाबतचा तपास सुरू असल्याचे विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्यण अधिकारी रविंद्र हजारे यांनी सांगितले.