महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cruise Safari : सुट्या घालवण्यासाठी क्रूझ सफारीकडे भारतीयांचा कल वाढला

सध्या अनेक जण सुट्या घालवण्यासाठी विविध ठिकाणांचा शोध घेत आहेत. मात्र ऑगस्ट 2022 च्या अभ्यासातून समोर आलेल्या टॉप ट्रॅव्हल ट्रेंड मधे ( Top Travel Trends ) 10 पैकी 8 शहरी भारतीय कुटुंबे आंतरराष्ट्रीय प्रवास ( International travel ) करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे. ते पुढील 12 महिन्यांत क्रूझ सफारी सुट्टीचा विचार करत आहेत. 79 टक्के भारतीयांना त्यांच्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवायची आहे. तर 89 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की संपूर्ण आरोग्यासाठी कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवणे खूप महत्त्वाचे आहे.

cruise safari
क्रूझ सफारी

By

Published : Oct 17, 2022, 11:01 AM IST

Updated : Oct 17, 2022, 12:23 PM IST

मुंबई :सध्या अनेक जण सुट्या घालवण्यासाठी विविध ठिकाणांचा शोध घेत आहेत. मात्र ऑगस्ट 2022 च्या अभ्यासातून समोर आलेल्या टॉप ट्रॅव्हल ट्रेंड मधे ( Top Travel Trends ) 10 पैकी 8 शहरी भारतीय कुटुंबे आंतरराष्ट्रीय प्रवास ( International travel ) करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे. ते पुढील 12 महिन्यांत क्रूझ सफारी ( cruise safari ) सुट्टीचा विचार करत आहेत. 79 टक्के भारतीयांना त्यांच्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवायची आहे. तर 89 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की संपूर्ण आरोग्यासाठी कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवणे खूप महत्त्वाचे आहे.

क्रूझ सफारी :दर्जेदार वेळ घालवता यावा म्हणून क्रूझवर सुट्टी घेण्याची इच्छा दर्शवत आहेत. "एका सुट्टीत अनेक स्थळे सहजतेने एक्सप्लोर करण्याची ईच्छा समुद्रात प्रवासादरम्यान पूर्ण होते. सुमारे 78 टक्के नासगरिकांनी त्यांचे सुट्टीतील ( vacation ) उद्दिष्ट त्यांच्या प्रियजनांसोबत आठवणी निर्माण करण्यासाठी प्रवास करणे आहे असे सांगितले. तर 65 टक्के लोकांनी सांगितले की ते वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि काहीतरी नवीन अनुभवण्यासाठी प्रवास करतात. यात ते त्यांची 15 वर्षांपेक्षा कमी वयाची लहान मुले समाविष्ट करतात. त्यांचा असा विश्वास आहे की सुट्टीच्या निवडींचा विचार करताना मुलांसाठी अनुकूल सुट्टीचे पर्याय आणि जेवणाचे पर्याय खूप महत्वाचे आहेत.

सहवासाचा आनंद :समुद्रपर्यटन भारतीय कुटुंबांसाठी पुन्हा कनेक्ट ( Quality time with family ) करू इच्छिणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. विविध प्रकारचे मनोरंजन, जेवण आणि उत्तम राहण्याची सोय या पर्यायांसह समुद्रपर्यटन विविध प्रकारच्या प्रवाशांची पूर्तता करते. याव्यतिरिक्त, समुद्रपर्यटन, शांतता, कल्याण आणि चिंतामुक्त प्रवासाची भावना वाढवते. कौटुंबिक प्रवासाच्या उद्दिष्टांना एक नवीन अर्थ प्राप्त झाला आहे. भारतीय कुटुंबे त्यांचे बंध दृढ करण्यासाठी आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी नवीन आणि रोमांचक अनुभवांसह गमावलेला वेळ भरून काढू इच्छित आहेत.

Last Updated : Oct 17, 2022, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details