महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक...राज्यात 786 पोलिसांना कोरोनाची लागण; 7 जणांचा मृत्यू - Attack on Maharashtra Police

कोरोनाचा सामना करता करता पोलीस दलातील शेकडो कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. राज्य पोलीस दलातील 786 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यात 88 पोलीस अधिकारी आणि 698 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मुंबईत 4, पुणे, सोलापूर, नाशिक येथे प्रत्येकी एक अशा एकूण 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस

By

Published : May 10, 2020, 11:38 AM IST

मुंबई -कोरोनाविरोधात पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, हे करताना त्यांच्या स्वत:चा जीव धोक्यात आहे. राज्य पोलीस दलातील 786 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यात 88 पोलीस अधिकारी आणि 698 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मुंबईत 4, पुणे, सोलापूर, नाशिक येथे प्रत्येकी एक अशा एकूण 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या 703 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 75 पोलीस अधिकारी आणि 628 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात आत्तापर्यंत 76 पोलीस कोरोनातून बरे झाले आहेत.

पोलीस, डॉक्टर्स आणि नर्सेसवर हल्ले वाढले -

राज्यात कोरोना लॉकडाऊन दरम्यान तब्बल 1 लाख 1 हजार 245 गुन्हे दाखल करण्यात आले असून 19 हजार 513 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 200 घटना घडल्या असून या प्रकरणी 732 जणांना अटक करण्यात आली आहे. 79 पोलीस कर्मचारी व 1 होमगार्ड असे 80 जण जखमी झाले आहेत. वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय पथकांवर हल्ला झाल्याचे 32 गुन्हे घडले आहेत. पालघर जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या गुन्ह्यात 143 जणांना अटक झाली असून जालना जिल्ह्यातून 46 जणांना अटक झाली आहे. साताऱ्यात 25 जणांना पोलिसांवर हल्ला करण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सर्वाधिक गुन्हे पुणे शहरात तर सर्वाधिक कमी गुन्हे अकोल्यात -

राज्यभरात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण क्रमांकावर आत्तापर्यंत 87 हजार 893 फोन आले आहेत. अवैध वाहतुकीसंदर्भात 1 हजार 291 गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 55 हजार 650 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुणे शहरात सर्वाधिक 16 हजार 922 गुन्हे दाखल असून त्या खालोखाल पिंपरी चिंचवड 8 हजार 786 , नागपूर शहर 4 हजार 452, नाशिक शहर 5 हजार 434 यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी गुन्हे(80) अकोला येथे नोंदवले गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details