मुंबई- आज मुंबईत लोकसभेचे चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. यावेळी युवकांमध्ये निरुत्साह तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. याचा प्रत्यय आज भांडुपमध्ये आला. आजारी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय ज्योत्स्ना शहा यांनी मतदान करण्याचा हट्ट धरत डॉक्टरांच्या परवानगीने थेट मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भांडुप येथील मतदान केंद्र गाठले.
रुग्णालयातून थेट मतदारकेंद्रात जाऊन आजारी ७५ वर्षीय ज्योत्स्ना यांनी बजावला मतदानाचा हक्क
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय ज्योत्स्ना शहा यांनी मतदान करण्याचा हट्ट धरत डॉक्टरांच्या परवानगीने थेट मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भांडुप येथील मतदान केंद्र गाठले.
मतदानाचा हक्क हा महत्वाचा आहे. एका मताने खूप फरक पडतो. यामुळे मी ठरवले की मतदान हे कोणत्याही परिस्थितीत करायचेच. त्यानुसार डॉक्टरांची परवानगी घेऊन मी मतदान केले. आतापर्यत मी एकही मतदान चुकवले नव्हते मग यावेळी तरी कसे चुकवू, असे शहा यांनी सांगितले.
माझी आई आजारपणामुळे ७ दिवसांपासून रुग्णालयात आहे. परंतु, तिने माझ्याकडे यंदा मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी डॉक्टरांच्या परवानगीने तिला मतदान केंद्रापर्यत नेले, असे शहा यांच्या मुलाने सांगितले.