मुंबई/नवी दिल्ली : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. यावेळी आरआरआर चित्रपटाचे नायक अल्लू आर्जून यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच आलिया भट्ट, क्रिती सेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान मिळाला आहे. देशातील सर्व पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वात मोठा मानला जातो. यामुळे या पुरस्कार विजेत्यांच्या यादीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. उत्कृष्ट चित्रपटात आरआरआर, पुष्पा या चित्रपटांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला मिळाला आहे. 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटानेही बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.
RRR 5 पुरस्कार : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार RRR या चित्रपटाने तब्बल ५ पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक (गायक), सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्टंट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा श्रेणींमध्ये चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.
आलिया, क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार : विकी कैशलच्या सरदार उधम या चित्रपटालाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट्ट, क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासाठी कंगना राणौतच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. मात्र, कंगनाच्या ऐवजी क्रितीला हा पुरस्कार मिळाला.