मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ( Corona Patients Increasing in Mumbai ) तिसऱ्या लाटेत आढळून येणारे बहुसंख्य रुग्ण घरातच उपचार घेऊन बरे होत असल्याने लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. ( Corona Patients Quarantine at Home ) यामुळे महिनाभरात होम क्वारंटाईन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईमधील होम क्वारंटाईन रुग्णांचा आकडा ६ लाख ६३ हजारांवर गेला आहे.
९० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत -
मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या वाढून तीन दिवस २० हजारावर रुग्ण आढळून आले. त्यात काल रविवारी किंचित घाट होऊन १९ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. रोज २० हजाराच्या सुमारास रुग्ण आढळून येत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १ लाखावर गेली आहे. जे रुग्ण रोज आढळून येत आहेत त्यापैकी ९० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची तर १ टक्के रुग्णांना आयसीयू बेडची आवश्यकता भासत आहे. यामुळे मुंबईमध्ये आढळून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन केले जात आहे.
६ लाख ६३ हजार ५१ लोक होम क्वारंटाईन -
मुंबईमध्ये सध्या कोरोनाचा संसंर्ग झालेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले असे ६ लाख ६३ हजार ५१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ५४२ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ५७ हजार ३८८ रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण ९० लाख २ हजार ७८२ लोकांनी होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण ९६ लाख ६६ हजार ३७५ लोकांचा पालिकेने शोध घेतला आहे. त्यापैकी ५५ लाख ६९ हजार ५९ म्हणजेच ५८ टक्के हाय रिक्स संपर्क आहेत. तर ४० लाख ९७ हजार ३१६ म्हणजेच ४२ टक्के लो रिस्क आहेत.
घरीच राहून रुग्ण बरे -
मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही रुग्णालयात भरती न होता घरी राहून रुग्ण बरे होत आहेत. घरीच राहून रुग्ण बरे होत असल्याने लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या पॉजिटीव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. यामुळे हा आकडा मोठा दिसत आहे. होम क्वारंटाईन आणि आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा दिसत असला तरी ४ ते ५ दिवसात रुग्ण बरे होत आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हेही वाचा -Mumbai Mayor On Corona : मुंबई डेंजर झोनच्या बाहेर, मात्र काळजी घ्या - किशोरी पेडणेकर