महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्य रेल्वेच्या ताफ्यात 6 एसी लोकल होणार दाखल

नवीन वर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांना एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात 6 एसी लोकल दाखल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल दाखल झाली असून या जानेवारी महिन्याच्या अखेरीस ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

railway
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Jan 1, 2020, 11:31 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात 6 एसी लोकल दाखल होणार आहेत. हे काम टप्प्याटप्प्याने होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. डिसेंबर 2019 ला मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल दाखल झाली असून या जानेवारी महिन्याच्या अखेरीस ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा -मुंबईकर थंड, रेल्वेचा खिसा मात्र गरम...

नवीन वर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांना एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे. मध्य रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट, वायफाय यासोबतच आता नवीन एसी लोकल सुरू केली जाणार आहे. प्रवाशांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आणि रेल्वेची सुरक्षा अत्याधुनिक करणे हा नवीन वर्षातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा संकल्प असल्याचे सुतार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details