महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Heroin Seized Mumbai : मुंबई विमानतळावर 56 कोटींचे ड्रग्ज जप्त; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई - heroin seized at mumbai airport

सीमाशुल्क विभागाने एका परदेशी महिलेकडून (आफ्रिकन नागरिक) ८ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केले आहे. ( Heroin Seized Mumbai ) ही कारवाई मुंबई विमानतळावर करण्यात आली आहे. ( Drugs Seized at Mumbai Airport ) जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ५६ कोटी रुपये आहे.

symbolic photo
संग्रहित

By

Published : Feb 28, 2022, 5:22 PM IST

Updated : Feb 28, 2022, 6:47 PM IST

मुंबई -सीमाशुल्क विभागाने एका परदेशी महिलेकडून (आफ्रिकन नागरिक) 8 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केले आहे. ( Heroin Seized Mumbai ) ही कारवाई मुंबई विमानतळावर करण्यात आली आहे. ( Drugs Seized at Mumbai Airport ) जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 56 कोटी रुपये आहे. या आफ्रिकन महिलेला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने 26 फेब्रुवारीला केलेल्या एका कारवाईत अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. परदेशातून आलेल्या एका प्रवाशाची कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारावर चौकशी केली असता तिच्याकडे 8 किलो हेरॉईन सापडून आलं.
मझीज असे या प्रवासी महिलेचं नाव आहे. ती जोहान्सबर्गवरुन मुंबईत दाखल झाला होती. तिने हेरॉईन आपल्या बॅगेत छोट्या पिशव्यांमध्ये भरुन ठेवलं होतं.

हेही वाचा -Heroin Seized Mumbai : मुंबईत 2 कोटी 7 लाख किमतीचा हेरॉईन ड्रग्सचा साठा जप्त, दोघांना अटक

आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत 56 कोटींच्या घरात असल्याचं कळतंय. या प्रवाशाची चौकशी केली असता त्याला हे अमली पदार्थ जोहान्सबर्ग विमानतळावर एका व्यक्तीने दिल्याचं कस्टम विभागाला समजलं आहे. कस्टम विभागाने या परदेशी व्यक्तीला अटक केली असून हे अमली पदार्थ तो मुंबईत कोणाला विकण्यासाठी आला होता याची चौकशी सुरू आहे. कस्टम विभागाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

Last Updated : Feb 28, 2022, 6:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details