मुंबई- मागील 24 तासात मुंबईत कोरोनाचे नव्याने 52 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 330 झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 22 झाली आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या शताब्दी रुग्णालयातील 40 कर्मचाऱ्यांची टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे.
मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 38 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 ते 31 मार्च दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यापैकी 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमध्ये नव्याने 52 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 330 झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्यात 3 जणांना दिर्घकालीन आजार होता. तर एक जण वयोवृद्ध होता. 4 जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईमधील मृतांची संख्या 22 झाली आहे.