मुंबई: जुहू बीचवर 6 जण समुद्रात बुडाल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) स्पष्ट केले. 6 पैकी 2 जणांला वाचवण्यात यश आले. उर्वरित 5 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकाकडून 'सर्च ऑपरेशन' अद्यापही सुरू आहे.
ते मुले 12 ते 15 वयोगटातील:पश्चिम उपनगरातील जुहू कोळीवाडा येथे ही घटना घडली. सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 12 ते 15 वर्षे वयोगटातील पाच मुलांचा गट आज सायंकाळी 5.30 च्या सुमारास समुद्रात गेला होता. नागरी अधिकाऱ्यांना सुरुवातीला 6 जण समुद्रात गेल्याची माहिती मिळाली होती; पण आता 5 मुले बुडाल्याची पुष्टी झाली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
भरती-ओहोटीमुळे बचावकार्यात अडचण: समुद्राची भरती-ओहोटीमुळे अग्निशमन दलाला शोधकार्यात अडचण येत आहे. अधिकारी म्हणाले की, नौदल आणि तटरक्षक दलातील गोताखोरांनाही या मोहिमेत सामील होण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
'बिपरजॉय'चा प्रभाव: 15 जून रोजी गुजरात किनार्यावर चक्रीवादळ 'बिपरजॉय'च्या लँडफॉलच्या अगोदर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. नागरी अधिकाऱ्यांनी लोकांना आणि मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून सावध केले आहे. आयएमडीने म्हटले आहे की, चक्रीवादळ 'बिपरजॉय' गुरुवारी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ 'अत्यंत तीव्र चक्री वादळ' म्हणून उतरण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत पोहोचेल. IMD ने मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट तर गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पंतप्रधानांच्या सूचना: चक्रीवादळ जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे. ते 15 जून रोजी दुपारच्या सुमारास गुजरातच्या किनार्यावर धडकेल. त्याआधी ताशी 135-145 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात आणि 150 किमी प्रतितास ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल," पीटीआयने यासाठी आयएमडीचा हवाला दिला. गुजरातमधील सुमारे 7,500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून मच्छिमारांना 16 जूनपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीत चक्रीवादळाच्या मार्गात असुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.