महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...सकाळी 9 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

जागतिक स्त्री-पुरूष समानता निर्देशांकात भारत ९५ व्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. नाशकातील महाराष्ट्र बँकेच्या दाभाडी शाखेत एक कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे त्यातील आरोपी गणेश सोनवणेला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पालिकेतील अयोग्य पद्धतीने कर्मचाऱ्यांचा पगार कापल्यास अधिकाऱ्यांचे पगार थांबवणार आहेत. बुलडाण्यात माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर मृतदेहाजवळ 'सुसाईड नोट' सापडली आहे.

आज...आत्ता...

By

Published : Jun 5, 2019, 9:00 AM IST

जागतिक स्त्री-पुरूष समानता निर्देशांकात भारत ९५ व्या स्थानावर

नवी दिल्ली - वैश्विक स्त्री-पुरूष समानता निर्देशांकात १२९ देशांमध्ये भारत ९५ स्थानावर आहे. ही यादी गरिबी, आरोग्य, शिक्षण, साक्षरता, राजकीय प्रतिनिधित्व आणि कामाच्या ठिकाणावरील समानता या मुद्द्यांचा अभ्यास करून तयार करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी चंद्रकात पाटील दिल्लीत, शाह यांची घेणार भेट

मुंबई - आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. यासाठी भाजपकडून शिवसेना आणि महायुतीत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, या वाटाघाटीवर शिवसेना नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासाठी भाजपचे जेष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत. या भेटीत ते भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे वाचा सविस्तर.

नाशकातील महाराष्ट्र बँकेच्या दाभाडी शाखेत एक कोटी रुपयांचा अपहार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक - मालेगाव तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या दाभाडी शाखेतून शेकडो खातेदारांच्या खात्यातून लाखो रुपये परस्पर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बँकमित्र गणेश सोनवणेला अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

अयोग्य पद्धतीने कर्मचाऱ्यांचा पगार कापल्यास अधिकाऱ्यांचे पगार थांबवणार

मुंबई - बायोमेट्रिक हजेरीमुळे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार कापले जाण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बायोमेट्रिकमुळे कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याचा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि खाते प्रमुखांचे पगार थांबवले जातील असे आश्वासन आयुक्त प्रवीण परदेशी दिले आहेत. अशी माहिती कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने दिली आहे. वाचा सविस्तर

बुलडाण्यात माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; मृतदेहाजवळ सापडली 'सुसाईड नोट'

बुलडाणा - खामगाव तालुक्यातील रोहणा येथे माय-लेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सुनंदा नामदेव निमकडे आणि शारदा पुंडलिक रोठे, अशी मृतांची नावे आहेत. वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details