मुंबई - मार्चपासून मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र, एक महिन्यानंतर काल (रविवारी) पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. रविवारी 645 रुग्ण आढळून आले होते. त्यात घट झाली असून आज (सोमवारी) मुंबईत कोरोनाचे 493 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 493 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 14 हजार 569वर पोहचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 420वर पोहचला आहे. 566 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 96 हजार 761वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 5531 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 455 दिवस इतका आहे.
मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 85 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 992 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 30 लाख 26 हजार 078 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.