महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 441 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 8 हजार 613 वर - corona

मुंबईत आज नव्याने 441 रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारच्या यादीत मुंबई रेड झोनमध्ये आहे.

संग्रहीत
संग्रहीत

By

Published : May 3, 2020, 8:29 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत नव्याने 441 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 8 हजार 613 वर पोहचली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 343 वर पोहचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबई हा कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट झाला आहे. केंद्र सरकारच्या यादीत मुंबई रेड झोनमध्ये आहे. मुंबईत रोज कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळुन येत आहेत. मुंबईत कोरोनाचे नव्याने 441 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 381 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 60 रुग्ण 30 एप्रिल आणि 1 मे रोजी खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील 10 जणांना दिर्घकालीन आजार होते. 7 जणांचा मृत्यू वार्धक्याने झाला. 21 पैकी 12 पुरुष तर 9 महिला रुग्ण होत्या. मुंबईमधून गेल्या 24 तासांत 100 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 804 वर पोहचली आहे.

हेही वाचा -मालवणीच्या मस्जिदची जागा क्वारंटाईन सेंटरसाठी उपलब्ध

ABOUT THE AUTHOR

...view details