महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 14, 2020, 5:03 PM IST

ETV Bharat / state

इराणहून आलेले 44 भारतीय घाटकोपरच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली

इराणमधून आलेल्या सर्व संशयित नागरिकांना पुढील 14 दिवस येथेच वेगळ्या वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. तसेच कोणाच्या कोरोना सदृश्य हालचाली दिसल्या तर त्यांना मुंबईतील इतर रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

Ghatkopar
घाटकोपर

मुंबई- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. इराण येथे धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या 44 भारतीयांना शुक्रवारी मुंबईत आणल्यानंतर घाटकोपरच्या नौसेना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यातील कोणालाही कोरोना विषाणूबाधा झाली नसून पुढील 14 दिवस ते येथेच असणार आहेत.

चीनच्या वुहान शहरातून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण चीनमध्ये हाहाकार उडवला आहे. या कोरोना विषाणूने चीननंतर इराणमध्येही थैमान पसरले असताना तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारतामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू होते. शेवटी शुक्रवारी या 44 भारतीयांची दुसरी तुकडी इराणमधून भारतामध्ये आली.

सध्या या सर्वांना मुंबईच्या घाटकोपर येथील नौसेना सामग्री भवन येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सर्व संशयित कोरणाग्रस्त नागरिकांना घाटकोपर परिसरामध्ये ठेवू नये, अशी शुक्रवारी विधानसभेत येथील स्थानिक आमदार राम कदम यांनी मागणी केली होती.

दरम्यान, नौसेना रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या सर्व संशयित नागरिकांना पुढील 14 दिवस येथेच वेगळ्या वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. तसेच कोणाच्या कोरोना सदृश्य हालचाली दिसल्या तर त्यांना मुंबईतील इतर रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details