मुंबई - किरकोळ कारणावरून टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यास उच्च शिक्षित वकिलासह एका रेल्वे कर्मचाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत.
टिळक नगर रेल्वे स्थानकात सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण; 2 आरोपींना अटक, तर दोन फरार - आरोपी
किरकोळ कारणावरून टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यास उच्च शिक्षित वकिलासह एका रेल्वे कर्मचाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत.
महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान शंकर मनोहर आव्हाड (वय 30) हे हार्बर मार्गावरील टिळक नगर रेल्वे स्थानकात आपले कर्तव्य बजावत होते. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेच्या तिकीट घराजवळ आरोपी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (वय 31) हा दुचाकी पार्क करत होता. तेव्हा जवान शंकर यांने त्या ठिकाणी गाडी पार्क करण्यास मज्जाव केला. तेव्हा आरोपी अब्दुल कादीर यांच्यासोबत एक साथीदार होता. त्या दोघांनी आणखी दोन साथीदारांना बोलावून जवान शंकर याला मारहाण केली.
तेव्हा जवान शंकर यांनी नेहरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी आणि इरफान अब्दुल अजिज अन्सारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे अब्दुल कादीर हा रेल्वे खात्याचा कर्मचारी आहे, तर इरफान वकील आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.