मुंबई- 3 कोटींच्या कोकेनसह केनियन नागरिकाला मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने अटक केली आहे. डेविड लेमोरोन तुंबूलाई (33) असे त्या अमली पदार्थ केनियन तस्काराचे नाव आहे.
मुंबईत 3 कोटींचे कोकेन जप्त; केनियन नागरिकाला अटक - अटक
डेविड लेमोरोन तुंबूलाई (33) असे त्या अमली पदार्थ केनियन तस्काराचे नाव आहे.
मुंबईत 3 कोटींचे कोकेन जप्त; केनियन नागरिकाला अटक
तुंबलाई हा 24 मेच्या रात्री उशिरा मुंबईतील जुहू परिसरातून अमलीपदार्थाची तस्करी करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुंबईतील खार परिसरातील कार्टर रोड परिसरातील उच्चभ्रू वस्तीत हा आरोपी संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेस आले. त्यावेळी पोलिसांनी कारावई करत त्याला अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 510 ग्राम कोकेन हस्तगत केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 3 कोटी 6 लाख एवढी किंमत आहे.