महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रासाठी लागणार ३ लाख शाईच्या बाटल्या - elections

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरता महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये जवळपास ९ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्याकरता निवडणूक आयोगामार्फत सुमारे ३ लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती.

मतदान बजावल्यानंतर शाई लावताना

By

Published : Mar 25, 2019, 11:27 PM IST

मुंबई- मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताचे बोट अभिमानाने दाखवितात. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे. येत्या निवडणुकीत बोटावर शाई लावण्यासाठी सुमारे ३ लाख बाटल्या लागणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.


या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरता महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये जवळपास ९ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्याकरता निवडणूक आयोगामार्फत सुमारे ३ लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.


कोठे बनते ही शाई -
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी आणिकाही दिवस न पुसली जाणारी ही शाईम्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.


राज्यातील ४८ मतदार संघामध्ये सुमारे ९५ हजार मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रावर या शाईच्या बाटल्या तसेच त्याचबरोबर मतदानासाठी लागणानरे आवश्यक साहित्य पुढील आठवड्यात पोहचवण्यात येणार आहे. याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details